
पुणे PUNE – राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP अजित पवार गटाचे अधिकृत Twitter account suspended ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) कंपनीने ही कारवाई केल्याचे सांगितले जात असून नियमांचे उल्लंघन हे यामागील कारण असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याबाबत अधिक स्पष्टीकरण होऊ शकलेले नाही. (Twitter account of Ajit Pawar Group Suspended) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांचे सोशल मिडियावर वेगवेगळे अकाउंट आहेत.
बुधवारी अजित पवार गटाच्या ट्वीटर अकाऊंटवर हे अकाऊंट सस्पेंड केल्याचा संदेश बघायला मिळत आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई केल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मात्र नेमके कारण यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. यासंदर्भात लवकरच अजित पवार गटाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे
