मुंबई विमानतळावर विमान क्रॅश

0
23

 

मुंबई: मुंबई विमानतळावर खासगी विमान (VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL) कोसळल्याने लँडिंग बंद करावे लागले. वाईट हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती असून या एअरक्राफ्टमध्ये बसलेले काही प्रवासी गंभीर जखमी झाले. हे विमान विशाखापट्टनमवरून मुंबईला येत होते. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेल्या तुफान पावसामुळे सध्या खराब हवामान आहे. विमानाचे जेव्हा लँडिंग होत होतं, त्यावेळी विमान नियंत्रणाबाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच हे खासगी विमान कोसळलं आणि ही भीषण दुर्घटना घडल्याचे कळते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा