
अमरावती – 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या आणि काम दुसऱ्याचं केलं असं विधान खासदार नवनीत राणा यांनी काल तिवसा येथे दहीहंडी स्पर्धेत केलं होतं. तसेच दर्यापूर काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांच्यावर रवी राणा यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. यावर अमरावतीत युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नवनीत राणा यांची ईडी व आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत चौकशी करावी तसेच सार्वजनिक ठिकाणी आमदार बळवंत वानखेडे यांचा अपमान केल्याने रवी राणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसचे वैभव देशमुख यांनी केली आहे.