शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त

0
14

 

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत वर्ग आठवी, नववी आणि दहावी या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पंडा व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अमरावती बुद्धभूषण सोनवणे यांचेकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र अद्यापही त्यांच्या पत्राची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली गेली नाही. आज मात्र संतप्त गावकऱ्यांनी नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला संतप्त विद्यार्थी व गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यासाठी संतप्त विद्यार्थी व गावकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात व शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा