बाप रे बाप,अडीच लाख रुपयांचा नंदी

0
34

 

वर्धा – म्हणतात ना हौसेला मोल नसते, तान्हा पोळ्याच्या निमित्ताने हल्ली बालगोपालांसोबत त्यांच्या पालकांचा उत्साह बघितला की त्याची प्रचिती येते. आता हेच पहा ना वर्धा येथे तब्बल अडीच लाख रुपये किमतीचा नंदी बनवण्यात आला आहे. एमआयडीसीमध्ये ओंकार आर्ट येथे कलाकार सतीश राऊत यांनी हा नंदी बनवला आहे. नंदी तयार करण्यास जवळपास सात महिन्यांचा कालावधी लागला आहे. हा नंदी तयार करण्यास जवळपास एक ते दीड टन लाकडाचा वापर करण्यात आला आहे. साहिवाल प्रजातीचा तयार केलेला हा देखणा नंदी आकर्षणाचा विषय ठरत आहे. नंदी तयार करण्यास ओंकार आर्टचे शिवाजी राऊत यांच्यासह सहकऱ्यांनी देखील मदत केली आहे

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा