राष्ट्रवादीतील फुटीवर ६ ऑक्टोबरला सुनावणी

0
18

मुंबई- निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. दोन्ही गटांकडून पक्षावर दावे केले जात असल्याने प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे.
यासंदर्भात दोन्ही गटांकडून पक्षावर दावा सांगणारे दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे सादर झाले आहेत. विशेष म्हणजे पक्षात फूट झाल्याचा दावा कोणीच करीत नाही मात्र खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असल्याचे दावे दोघांकडूनही सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरु होत आहे. निर्णय लागेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय देखील होऊ शकते, असे अंदाज आहेत.
शरद पवार गटाने देखील पक्षात कुठेही फूट नसून काही लोकांनी केवळ वेगळा निर्णय घेतल्याचे दावे चालविले आहेत. तर अजित पवार गटाने देखील असेच दावे केले आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा