मंत्री गावित यांची कन्या शेतकरी योजनेची लाभार्थी: काँग्रेस

0
20

 

मुंबई: शेतकरी संपदा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली असून यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी ही मुख्य लाभार्थी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. गावित यांची मुलगी सुप्रिया गावित यांच्या मुलीच्या कंपनीला केंद्र सरकारकडून योजने अंतर्गत दहा कोटी रुपयांचे अनुदानही मिळाल्याचा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी किसान संपदा योजनेच्या लाभार्थ्यांची यादीही ट्विट केली आहे. त्याचा दाखला देत वडेट्टीवार यांनी हा दावा केला आहे. सुप्रिया गावित यांच्या “रेवा तापी औद्योगिक विकास” कंपनीला दहा कोटीची सबसिडी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा