नागपुरात भर पावसातही मारबत बडग्या मिरवणुकीची धूम

0
36

 

नागपूर – आज पाडवा अर्थात तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत उत्सव साजरा केला जातो. देशातील नागपूर एकमात्र असे शहर आहे जिथे ही परंपरा मागील 140 वर्षांपासून जोपासली जाते. आज सकाळी 11 वाजता या मारबत उत्सवाला सुरुवात झाली आहे. नागपुरातील इतवारी नेहरू पुतळ्या जवळ काळी आणि पिवळी ह्या दोन्ही मारबत भेटतात. काळी मारबत, पिवळी मारबत समोरासमोर वाकून नमस्कार करतात. मग या मारबत उत्सवाची मिरवणूक पूर्ण नागपूर शहर फिरते. मारबत सोबत अनेक बडगेही काढले जातात. त्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी चर्चेचा विषय घेऊन बडगे तयार केले जातात. हे मारबत आणि बडगे बघायला मोठ्या संख्येने नागपूरकर गर्दी करतात. या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बँड व डीजेवर लोक थिरकत असतात. काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असूनही आज पाडव्याच्या दिवशी नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा