राजेंद्र मुळक यांनी दिल्या बैलपोळ्याच्या शुभेच्छा

0
32

गुरूवार ला पोळ्याच्या पवित्र सणानिमित्त पारशिवनी तालुक्यातील ग्रामपंचायत निलज येथे मा.श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) व मा.सौ. रश्मीताई बर्वे (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर व विद्यमान सदस्य) यांनी उपस्थित राहून देशातील शेतकऱ्यांचा खरा सोबती व देशाच्या कृषी विकासात महत्वाचा कणा असलेल्या बैलांची पूजा करत बैलांप्रती प्रती कृतज्ञता व्यक्त केली व पारितोषिक वितरण केले. यावेळी शेतकरी बांधवांशी हितगुज साधली व बैपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

त्या प्रसंगी श्री. व्यंकटरावजी कारेमोरे (सदस्य, जि. प. नागपूर), श्री. नरेशजी मेश्राम (सदस्य, पं. स. बनपुरी), श्री. सोम्यकजी नेहाते (पोलीस निरीक्षक, पो.स्टे. कन्हान), श्री. सुनीलजी डोंगरे (सरपंच, ग्रा. पं. निलज), श्री. गुंडेरावजी भुते (उपसरपंच, ग्रा. पं. निलज), श्री. धनराज जी चकोले (सदस्य, ग्रा. पं. निलज), श्री. रामचंद जी चकोले (सदस्य, ग्रा. पं. निलज), सौ. राजकन्या ताई चकोले (सदस्य, ग्रा. पं. निलज), सौ. सिमाताई देशमुख (सदस्य, ग्रा. पं. निलज), श्री. देवराव जी चकोले (माजी सरपंच, ग्रा. पं. निलज), श्री. डोमाजी चकोले (माजी सदस्य, ग्रा. पं. निलज), श्री. हेमंत नागपुरे,श्री. सूरजजी चकोले, श्री. धीरजजी चकोले, श्री. आकाशजी चकोले इत्यादी मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा