मुली बेपत्ता प्रकरणात वाढ :शहर राकाँपा युवती सेल तर्फे पोलीस आयुक्त यांना निवेदन

0
41

महिला – मुलींच्या बेपत्ता होण्याच्या विषयाला धरून नागपूर शहर राकाँपा युवती सेल तर्फे पोलीस आयुक्त यांना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशानुसार व युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना महिला मुलींच्या बेपत्ता होणाच्या महाराष्ट्रातील वाढत्या टक्केवारीच्या मुद्द्याला गृहीत धरून नागपूर युवती काँग्रेस तर्फे निवेदन सादर करण्यात आले. देशात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १३.१३ लाख मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात संसदेत सादर केली. यातील सर्वाधिक मुली, महिला मध्य प्रदेशातील आहेत. त्यानंतर महिला व मुली बेपत्ता होण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीनुसार, १० लाख ६१ हजार ६४८ महिला अठरा वर्षांवरील असून दोन लाख ५१ हजार ४३० मुली या अठरा वर्षांखालील आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने ही आकडेवारी संकलित केली आहे.

या गंभीर विषयाला लक्षात घेत निवेदनामध्ये बेपत्ता झालेल्या महिला मुलींना शोधून काढण्यासाठी तसेच या पुढे महिला मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी योग्य ती उपाय योजना राबविण्यात यावी तसेच या करिता एक विशिष्ट समितीची ही स्थापना करण्यात यावी असे ही या वेळी पोलीस आयुक्त यांना युवती काँग्रेस तर्फे सुचविण्यात आले. या प्रसंगी नागपूर शहर युवती अध्यक्ष पूनम रेवतकर सह युवती पदाधिकारी बबिता मांडवकर, विधी सोनोले आणि निकिता भोयर उपस्थित होत्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा