बंदुकीच्या धाकावर पाच लाखाच्या खंडणीची मागणी, आरोपीला अटक

0
17

 

यवतमाळ : बंदुकीच्या धाकावर पाच लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना मारेगाव तालुक्यातील कोसारा शिवारात घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली. ललित उर्फ लल्ल्या अरुण गजभिये (वय 33, रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी, यवतमाळ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बंदुकीच्या धाकावर त्याने धमकाविल्याची तक्रार सय्यद मन्सूर सय्यद दाऊद (वय 34, रा. डेहणकर ले-आउट) याने दिली. मन्सूर हा आपल्या कामगारासह कोसारा शिवारात उभा असताना ललित गजभिये आपल्या एक अन्य साथीदारासह कारने आला. मला वाळू घाटाचा हप्ता दिला नाही. असे म्हणत बंदूक मन्सूरच्या डोक्याला लावली. तर, दुसर्‍या साथीदाराने चाकू पोटाला लावला. याप्रकरणी सय्यद मन्सूर याने मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा