
17MREG14 अमरावती डॉ.अनिल बोंडेंनी जाहीर केली जिल्हा कार्यकारणी
अमरावती, 17 सप्टेंबर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचा मूलमंत्र समाजाच्या प्रत्येक घटकात रुजवण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी सर्व समाज घटकांना स्थान देणाऱ्या सर्वसमावेशक भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा रविवारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली. डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारणीत उपाध्यक्ष, सचिव अनुक्रमे १५, सरचिटणीस ४, कार्यकारणी व निमंत्रित सदस्य अनुक्रमे ७७ व ८३ जणांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे.

भाजपाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून सिद्धार्थ वानखडे, सुभाष श्रीखंडे, सुधीर रसे, अर्चना मुरूमकर, प्रकाश कन्हेर रवींद्र मुंदे, उमेश यावलकर, मनोहर सुने, प्रवीण राऊत, आप्पा पाटील, प्रदीप गौरखेडे, विक्रम पाठक, श्रीधर सोलव तर सचिवपदी अंजली तुमराम, समिर हावरे, अमरदिप तेलखेडे, नंदकिशोर काळे, सोमकली दरसिंबे, सत्यजित राठोड, नितीन राऊत, नितीन पटेल, प्रियंका मालठाने, स्वप्नील भुयार, सदाशिव खडके, संदीप सोळंके, विलास तायवाडे, किरण देशमुख, मेघा भारती, तर सरचिटणीस म्हणून नितीन गुडधे पाटील, विवेक गुल्हाने, रेखाताई मावसकर, विलास कविटकर यासह महिला मोर्चा अनिता तिखीले, युवा मोर्चा अजिंक्य वानखडे, ओबीसी मोर्चा पद्माकर सांगोळे, किसान मोर्चा संजय घुलक्षे, अल्पसंख्यांक मोर्चा अनवर पटेल, अनुसूचित जाती मोर्चा मनोहर लेवटे, अनुसूचित जाती व जमाती मोर्चा सुखदेव पवार, तीसा मंडळ निलेश श्रीखंडे, अमरावती ग्रामीण राजीव गांधे, भातकुली सोपान गुडधे, चांदूरबाजार मुरली माकोडे, वरुड ग्रामीण राजकुमार राऊत, वरुड शहर योगेश्वर खासबगे, मोर्शी ग्रामीण निलेश शिरभाते, मोर्शी शहर राहुल चौधरी, दर्यापूर शहर रवींद्र ढोकणे, ग्रामीण मदन बायस्कार, अंजनगाव ग्रामीण रवी गोळे, अंजनगाव शहर उमेश भोंडे, अचलपूर शहर कुंदन यादव, ग्रामीण विशाल काकड, धारणी शहर श्याम गंगराळे, ग्रामीण लक्ष्मण जांभेकर, चिखलदरा ग्रामीण गजू खडके, शहर वेदांत शू, धामणगाव रेल्वे ग्रामीण मनोज डहाके, नांदगाव खंडेश्वर निकेत ठाकरे, चांदुर रेल्वे बबनराव गावंडे यासह ७७ सदस्य व ८३ कायम निमंत्रित सदस्यांना कार्यकारणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी खासदार डॉ.अनिल बोंडे, सरचिटणीस नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, रेखा रमेश मावस्कर, विलास कविटकर, संगीता शिंदे-बोंडे, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, सुखदेव पवार, अनिता किशोर तीखीले, मीना श्रीराव, सुनील माळोदे, मुरलीधर गडवाले, नामदेव गुल्हाने, अविनाश जसवंते, नितीन यावलकर, श्याम गांगराळे, गजानन बुरघाटे, अजय गुल्हणे,मनोहर लवटे, सुभाष श्रीखंडे, कन्हैया मित्तल, विलास तायवाडे, सिद्धार्थ वानखडे, दीपक तिखिले, मंगेश लांडगे यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते.