
अमरावती- भाजप सरकार आल्यानंतर युवकांना दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही युवकांना रोजगार मिळालेला नाही. एकीकडे देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम,कार्यक्रम साजरे केले जात आहेत. दुसरीकडे अमरावती शहरात युवक काँग्रेसच्यावतीने पंचवटी चौकात हातगाडीवर पदाधिकाऱ्यांनी भजी तळून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीमध्ये युवकांना आश्वासन दिले होते दोन कोटी युवकांना रोजगार देणार त्यांनी पण अजून एकाही युवकाला रोजगार दिला नसल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.मोदी आणि केंद्र शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली.