शिक्षकांनी शिक्षक क्षमता चाचणी परीक्षेवर टाकला बहिष्कार

0
17

 

वर्धा – आदिवासी आश्रम शाळेच्या शिक्षकांनी शिक्षक क्षमता चाचणी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. वर्धा जिल्ह्यातील सहा अनुदानित आणि दोन शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची क्षमता चाचणी परीक्षा लोक महाविद्यालय येथे होती परंतु आश्रम शाळा शिक्षकांनी एकमत करून परीक्षा देण्यास नकार दिला आहे. आमची क्षमता तपासण्यापेक्षा आम्हाला उत्तम प्रकारचे ट्रेनिंग द्या अशी मागणी यावेळी शिक्षकांनी केली. परीक्षा केंद्राबाहेर शिक्षकांनी काळ्याफिती लावून एकत्र होत परीक्षेबाबत निषेध व्यक्त केला आहे. आमची जेव्हा निवड केली तेव्हाच आमची क्षमता तपासली आहे आता क्षमता तपासण्याची गरज काय? असा प्रश्न यावेळी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा