लेखी आश्वासनाशिवाय आता ओबीसींची माघार नाही

0
14

नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये आणि कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यात येऊ नये , या प्रमुख मागण्यांबाबत राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आता माघार नाही असा इशारा आज ओबीसी महासंघाच्या वतीने अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिला. सोमवारी संविधान चौक येथून ओबीसी महामोर्चा निघाला. कडक पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा आकाशवाणी चौकापूर्वी अडविण्यात आल्यानंतर नेत्यांची भाषणे झाली. मोर्चाचे नेतृत्व ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, पुरुषोत्तम शहाणे,राजेश काकडे, अवंतिका लेकुरवाळे आदी कुणबी ओबीसी महासंघ पदाधिकारी करीत असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार, परिणय फुके, युवा नेते सलील देशमुख, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार अशोक धवड,आशिष देशमुख,ईश्वर बालबुधे आदी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यात सहभागी झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतरही ओबीसी महासंघाने आपला लढा कायम ठेवला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा