महिला आरक्षणाचे श्रेय घेण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

0
17

नवी दिल्ली-महिला आरक्षण विधेयकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला असून ते आम्ही आधीच आणले होते, असा दावा काँग्रेसने केला आहे. तर काँग्रेसने आणलेले विधेयक (Women Reservation Bill) कधीच व्यपगत झाले आहे, याकडे गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष वेधून काँग्रेसचा समाचार घेतला. दरम्यान, महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले असून ते संमत होणार असले तर लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण जनगणनेच्या आधारे सीमाकनानंतरच ते लागू होणार आहे. त्यामुळे २०२४ निवडणुकीत ते लागू होण्याची शक्यता कमीच असल्याचे मत व्यक्त होत आहे.
लोकसभा आणि काही विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे तोवर जनगणना आणि परिसीमन जवळजवळ अशक्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. 2026 मध्ये नियोजित मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर महिला आरक्षण लागू होईल, असं तज्ज्ञ सांगत आहेत. म्हणजे उशिराने निवडणूक असलेल्या विधानसभा आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत ते लागू होईल, असा दावा करण्यात येत आहे. यावर सरकारकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा