राज्यात सर्वत्र मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन

0
22

‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’ (Ganpati Bappa Morya… Mangalmurti Morya)च्या जयघोषात घरोघरी आज गणरायाचे आगमन झाले आहे. गणरायाचे आगमन होताच विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोकणात गणेश चतुर्थीचा उत्साह

कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सिंधुदुर्गात ७१,७९८ घरी बाप्पांचे आगमन होत असून मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. रत्नागिरीतल्या पावस, पूर्णगड भागात होडीतून बाप्पाचे आगमन झाले आहे. कोकणात गणेशोत्सवाचा सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. त्यामुळे फुगड्या घालून, टिपरी नृत्य करतच बाप्पाचे स्वागत केले जाते.

कोल्हापुरात गणेशाचे जल्लोषात आगमन

कोल्हापुरातही लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत अगदी धूमधडाक्यात करण्यात आले. कोल्हापुरातील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, गंगावेस येथे घरगुती गणपती नेण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली. घरातील लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनीच बाप्पाचे स्वागत केले.

गणेश टेकडी मंदिरात विधिवत पूजा

नागपूर – महाराष्ट्राचे आराध्यदैवत गणपती बाप्पाचे आज राज्यभरात वाजत-गाजत आगमन झाले. नागपुरातील श्री गणेश टेकडी मंदिरात सकाळी विधिवत पूजा करण्यात आली. या पूजेला लोकांनी एकच गर्दी केली होती. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून टेकडी गणेश मंदिराला आकर्षक फुलांनी

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा