दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो मृत्यू

0
14

 

बुलढाणा – सध्या पावसाळ्याचे दिवस असून शेतात काम करीत असताना शेतकरी व कामगार यांना कीडा-कीटकुल आदी नेहमीच चावत असतात. याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना सेल्युलायटीसचा आजार होऊ शकतो. या आजाराचे काही रुग्ण शहरात उपचारासाठी येत आहेत. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रोज १ ते २ रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे कीडा कीटकुल चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच त्या ठिकाणी खाजवू नये व त्वरित उपचार करावा, असे आवाहन खामगाव येथील सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वानखडे यांनी केले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा