
monsoon Thirteen districts including Amravati Akola red zone
20MREG19 दुष्काळाची टांगती तलवार अमरावती, अकोलासह १३ जिल्हे रेड झोनमध्ये

अमरावती, 20 सप्टेंबर (हिं.स.) यंदा पाऊस उशिरा दाखल झाला. त्यातच राज्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट असून, काही जिल्हे तर थेट रेड झोनमध्ये असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली असून, राज्यात जोरदार पावसाची गरज आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.
राज्यात पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यात पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सर्वत्र चांगला झाला नाही. कोकण आणि गोव्याचा काही भाग, तसेच ठाणे आणि नांदेड जिल्हा सोडल्यास इतर ठिकाणी पाऊस सरासरी इतका आहे. तसेच राज्यातील 13 जिल्ह्यात तर सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झालेला आहे. ज्यात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव,सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती या जिल्ह्यात सरासरी पेक्षा खूप कमी पाऊस झाला असून, त्यांच्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे हे तेराही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.