
नागपूर : महाराष्ट्राला (Maharashtra) सुजलाम सुफलाम कर, महाराष्ट्रातील जनतेला भरभरून आशीर्वाद दे, सुख दे, समाधान दे. तू सुखकर्ता आहे, दुखहर्ता आहे. या महाराष्ट्रावरचं विघ्न दूर कर… अशी प्रार्थना महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी बाप्पांच्या चरणी केलीय्.
चंद्रपूर (Chandrapur) येथील त्यांच्या निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची स्थापना मंगळवारी यथाविधी झाली.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वनमंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच विघ्नहर्त्याला, राज्यातील जनतेवर आपला कृपाशीर्वाद असाच असू दे अशी मनोकामना असे साकडेही घातले. महाराष्ट्रातील नागरिकांची स्वप्नं साकार करण्यासाठी मी गणरायाला साकडं घातलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे
