सुप्रिया सुळे अद्यापही नैराश्यात-सुनील तटकरे

0

नवी दिल्ली-अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे सुप्रिया सुळे यांना आलेले नैराश्य अद्याप दूर झालेले नसून त्यांना नैराश्याने घेरलेले असल्याची टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. (NCP MP Sunil Tatkare) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी संसदेत सत्ताधारी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची खुली चौकशी करण्याचे आव्हान दिले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तटकरे यांनी निशाणा साधला.
तटकरे म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी न्यायालयाचे निर्णयही आलेत. सध्या त्या वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशी विधाने करत आहेत. त्यांना हे विधान टाळता आले असते. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठिमागे अवघा महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा व विधान परिषदेतील सदस्यही अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला दिवसागणिक पाठिंबा वाढत असल्याचे तटकरे म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा