लॉर्ड्सच्या मैदानावर आदी चमकला

0

क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लंडनस्थित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर १५ वर्षांखालील मुलांच्या टी ट्वेंटी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत आदी खडसे याने चमकदार कामगिरी करीत स्कॉटलन्ड मेन स्टॅन्ड संघाला पराभवाची धुळ चारण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडली.

या सामन्यात कार्लटन क्रिकेट क्लब स्कॉटलंडच्या मेन स्टॅन्ड क्रिकेट क्लबचा पराभव करीत महत्त्वपूर्ण विजय संपादन केला.
या विजेत्या संघात मुळ अकोला रहिवासी पुणे येथील आदी राहुल खडसे याची भूमिका आणि एकूण

प्रदर्शन फारच चमकदार राहिले. सेमी फायनल ते फायनल जिंकण्यापर्यंत आदी खडसेच्या सहभागाचे सातत्याने कौतुक करण्यात आले. या चमूत दोन भारतीय खेळाडूंचा समावेश होता. यामध्ये आदीसह श्रेयस टेकाडे याचीही भुमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. पुणे येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधून उच्च पदावरून निवृत्त झालेले, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक अकोल्याचे मुळ रहिवासी डॉ. दामोदर खडसे यांचा आदि हा नातू आहे. एका भारतीयाने इंग्लंडमध्ये जाऊन आपले कौशल्य व गुणवत्ता दाखविल्याबद्दल आदीसह खडसे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा