सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची आशा मावळली

0

 

वर्धा – वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली परंतु सोयाबीनवर रोगाच्या प्रादुर्भावाने पीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनची लागवड केल्यानंतर सोयाबीन वाढले देखील. पण अचानक सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळू लागली आहेत. फवारणी करूनही प्रादुर्भाव रोखता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्न येण्याची आशा मावळली असून केलेला खर्च निघण्याची देखील शक्यता नाही. यामुळे त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेंगा लागण्याच्या वेळेतच झाडे वाळू लागली आहेत. यामुळे लागवडीपासूनचा अख्खा खर्च पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. अनेकांच्या शेतातील बिकट परिस्थितीने उत्पादनात घट होण्याची परिस्थिती आहे. काहींच्या शेतात तर सोयाबीनची झाडे वाळल्याने विदारक परिस्थिती आहे. सरकारने याची तातडीने दखल घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा