ओबीसी समाज अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात करणार

0

 

नागपूर -राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे,१२ व्या दिवशी देखील साखळी उपोषण संविधान चौकात सुरू आहे. आज डॉ मनोहर तांबुलकर, डॉ किरण नेरकर, नरेंद्र लीलारे, महेंद्र उईके, माधवराव गावंडे, भास्कर भोयर, अरुण साखरकर, डॉ रत्नाकर लांजेवार, भास्कर भनारे, राकेश ईखार, कल्पना मानकर,राजू खडसे, रविंद्र आदमने, गजानन काकडे, युवराज कामडे, प्रतिमा उईके आदी ओबीसी बांधव साखळी उपोषणात सहभागी झाले. अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी राज्यातील सर्व ओबीसी आमदारांनी मुख्यमंत्री यांचेकडे मागणी लावून धरणे गरजेचे आहे. कारण त्यांना मिळणारी जास्त मते ओबीसीचीच असतात. आम्ही सर्व संवैधानिक मागण्या ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठीच मागत आहोत. आज या विचार पिठावरुन शरद वानखेडे, सुरेश कोंगे,भाजप ओबीसीचे नेते नरेश बरडे, भूषण दडवे, डॉ राजेश ठाकरे, डॉ मनोहर तांबुलकर,प्रा रमेश पिसे, यांनी प्रधानमंत्र्यांनी महिला विधेयक पारित करतांना, ओबीसी महिलांना त्यात न्याय मिळाला नाही याविषयीची खंत बाळगली नाही म्हणत सरकारचा निषेध केला. या निमित्ताने सर्वानुमते असे ठरविण्यात आले,की सरकारने रविवारपर्यंत चर्चेला आमंत्रित केले नाही तर सोमवारपासून अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात करणार असे डॉ तायवाडे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणारे नागपूर- कामठी परदेशी धोबी समाजाचे नरेश बैस्वारे, कुणबी सेवासंघाचे पंकज पांडे, कुणबी महासंघाचे अध्यक्ष राजू भोतमांगे, कार्याध्यक्ष राजू खडसे यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात घनश्याम मांगे,श्रीकांत मसमारे, गेमराज गोमासे,हेमंत गावंडे, गणेश नाखले, अनंता भारसाकळे, अँड प्रकाश भोयर, सुशिल ठाकरे, नाना सातपुते,शकील पटेल, प्रा संजय चौधरी,अतुल गांजरे, अविनाश घागरे,रुषभ राऊत, रितेश कढव, माजी प्राचार्य विनोद गावंडे, अरुण वराडे हजर होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा