
अमरावतीत – कामाला सुरुवात अथवा व्यापारांचा शुभारंभ करण्यापुर्वी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय आजही पुढे पाऊल टाकण्याचे धाडस कुणीही करत नाही. कामगार आणि व्यापाऱ्यांचे श्रध्दास्थान म्हणून शहरातील जुन्या जेबी जीन परिसर येथील पुरातन गणपती मंदिराची ओळख आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे येथील भागचंद अग्रवाल यांनी 1895 मध्ये जयपुर येथून 4 फूट उंचीची उजवी सोंड असलेली संगमनेर दगडाची मूर्ती स्थापन केली होती. व्यापारी नगरी असलेल्या धामणगांवात 2 ते 3 राज्यातील व्यापारी त्यावेळी येत असत. तेथे काम करणारे कामगार तसेच व्यापारी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करीत नव्हते. गणेश चतुर्थी दरम्यान 10 दिवस मोठ्या उत्साहाने येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.