उपराजधानीत अतिवृष्टी एका महिलेचा मृत्यू,

0

14 जनावरे दगावली,349 जणांना सुखरूप काढले नागपूर -नागपुरातील अतिवृष्टीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला तर 14 जनावरे दगावली आहेत. शनिवारी दुपारपर्यंत 349 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून सकाळपासून पाऊस बंद झाल्याने मदत कार्याला वेग आला आहे. अंबाझरी तलाव,नागनदी, पिवळी नदी व नाल्यांची पाणी पातळी देखील बरीच कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मीराबाई पिल्ले (70) रा.महेश नगर यांचा मृत्यू झाला असून 12 मोठी तर 2 छोट्या जनावरांचा मृत्यू झाला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा