
अहमदाबाद-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील भेटीची पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्योगपती गौतम अदाणी यांच्या भेटीसाठी पवार अहमदाबादला गेले आहेत. अदाणींच्या घरी असलेल्या एका खासगी कार्यक्रमानिमित्त शरद पवार गेले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
शरद पवारांच्या मनात काय आहे, हे कोणीच सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनीही यावर बोलताना दिली. त्यामुळे मनात, पोटात आणि ओठात काय हे स्वतः शरद पवार यांनाच माहिती असते शरद पवार हे अदाणींचे मित्र आहेत. अदाणी शरद पवारांची वारंवार भेट घेत असतात. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.