रायपुर महामार्गावर 18 तास वाहतूक कोंडी

0

 

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यालगत गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांकावर सलग 18 तास वाहनांची कोंडी झाली होती. विशेषता साकोली ते शिरपुर/बांध सुमारे 50 किलोमिटरच्या अंतरापर्यंत खड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे अशी स्थिती असल्याने वाहनचालकांना सलग 18 तास जाम मध्ये अडकून रहावे लागले. महामार्गावर अग्रवाल ग्लोबन कंपनी तर्फे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे सतत वाहनचालकानां याचा त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी रात्रीपासून बंद पडलेला राष्ट्रीय मार्ग पुन्हा सुरु झाल्याने वाहनचालकानीं मोकळा श्वास घेतला असला तरी या राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा कधीही वाहतुक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा