विश्व सांस्कृतिक महोत्सव २०२३!

0

 

या शनिवार व रविवारी, जगभरातील सर्व नेत्र चांगल्या कारणा साठीवॉशिंग्टन डी.सी. कडे वळले असतील आणि 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर यूएस राजधानी येथे विविधतेचा आणि एकतेचा अविस्मरणीय उत्सव साजरा होईल ;

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जागतिक संस्कृति महोत्सवाची ही चौथी प्रस्तुती असणार आहे. कार्यक्रमात उद्बोधन देण्यासाठी विशेष मान्यवरांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे 8 वे सरचिटणीस; बान की-मून, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री; माननीय. एस.जयशंकर, यूएस सर्जन जनरल सन्माननीय डॉ विवेक मूर्ती, यूएस सिनेटचे सदस्य- माननीय रिक स्कॉट, माननीय. नॅन्सी पेलोसी, . भारताचे माजी राष्ट्रपती-सन्माननीय श्री राम नाथ कोविंद,
सुरीनाम चे संरक्षण मंत्री- माननीय कृष्णकोमेरी माथोएरा यांचा समावेश आहे.

यूएस कॅपिटलच्या प्रतिष्ठित पार्श्वभूमीच्या समोर सेट केलेला, स्टेज च फक्त फुटबॉल मैदानाच्या आकाराचा आहे. या कार्यक्रमात 17,000 कलाकार, असंख्य राष्ट्रप्रमुख आणि 100 हून अधिक देशांतील विचारवंत नेते यांचा एक भव्य मेळावा पाहायला मिळेल, हे सर्व नॅशनल मॉलमध्ये एकत्र जमतील.

या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण म्हणजे अर्धा मिलियन लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे हे एक अभूतपूर्व जागतिक उत्सव बनले आहे.

इव्हेंटमध्ये 50 हून अधिक परफॉर्मन्स समाविष्ट आहेत:
उदाहरणार्थ
1,000 गायक आणि नर्तकांसह पारंपारिक चीनी सांस्कृतिक कार्यक्रम.
7,000 नर्तकांसह गरबा
7 00 शास्त्रीय नर्तकांसमवेत नृत्याची जिवंत प्रस्तुती.
कुर्तीस ब्लो किंग चार्ल्र्स आणि केली फॉरमॅन यांच्या नृत्यसंयोजना 100 ब्रेक डान्सर्सची प्रस्तुति
100 युक्रेनियन नर्तकां द्वारा प्रस्तुत केलेले त्यांचे पारंपरिक हो पाक
ग्रेनी अवार्ड विजेते मिकी फ्री यांची 1000 गिटार वादक यांच्या समवेत केलेली प्रस्तुति

बॉब मार्ले यांची भव्य दिव्य प्रस्तुति *वन लव याचे त्यांच्या नातू स्किप मार्ले द्वारा केलेली पुनर्प्रस्तुति *गर्ल सिक्वेन्स डीजे कूल, किंग चार्ल्स आणि केली फोरमन यांच्या नृत्यदिग्दर्शनात १०० ब्रेक नर्तकांसह हिप-हॉपच्या इतर दिग्गजांनी हिप-हॉपला 50 व्या वर्धापनदिनानिमित्त श्रद्धांजली सादर करणार आहेत उल्लेखनीय आहे की नॅशनल मॉलमध्येच मार्टिन ल्यूथर किंग यांनी 1963 मध्ये जगाला समानता आणि एकतेचा संदेश देण्यासाठी प्रसिद्ध “आय हॅव अ ड्रीम” भाषण दिले होते.

त्याच्या एक शतकापूर्वी, शिकागो येथील पहिल्या जागतिक धर्म संसदेत, स्वामी विवेकानंदांनी एक झगमगते भाषण केले ज्याचे उपस्थित सर्व मंडळींनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात कौतुक केले त्यांनी जगातील प्रमुख धर्मांच्या प्रतिनिधींना त्यांचे भाऊ आणि बहिणी म्हणून संबोधित केले आणि धार्मिक कट्टरता आणि असहिष्णुता संपविण्याचे आवाहन केले.

29 सप्टेंबर 2023 रोजी नॅशनल मॉल येथे गुरुदेव श्री श्री रविशंकर 180 देशांतील लोकांना वसुधैव कुटुम्बकम ” च्या झेंड्याखाली एकत्र करून सीमा, धर्म आणि वंश यांच्यातील भेद दूर करतील.
वेगवेगळ्या भोजन पद्धती सर्वांना एकत्र आणत असतात म्हणूनच या कार्यक्रमात जगभरातील पाककृती देखील असतील. नवोदित कलाकार आणि प्रस्थापित कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ देण्याची गुरुदेवांची बांधिलकी ही या महोत्सवाला वेगळेपणा मिळवून देते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा