
(Mumbai)मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा या नेत्यांनी मुंबई दौऱ्यावर महाराष्ट्रातील खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. (Lok Sabha Election 2024) या आढाव्यात राज्यातील काही खासदारांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे आणि त्यांचा फेरविचार केला जाणार असल्याचे संकेत भाजपकडून देण्यात आले आहेत. या खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांची चाचपणीही भाजपने सुरु केली आहे. मुंबईतही काही जागांवर बदल होणार शक्यता व्यक्त होत आहे.
भाजपने लोकसभा २०२४ निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणे सुरु आहे. मुंबई दौऱ्यावर (Home Minister Amit Shah)गृहमंत्री अमित शाह आणि (BJP state president JP Nadda)भाजप प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. काही महत्वाच्या जागांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीी भाजपचे मुंबईतील सर्व खासदार आणि आमदारांची बैठकही झाली. या आढाव्यात काही खासदारांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याने त्यांचे तिकीट कापले जाण्याचे संकेत भाजपकडून देण्यात आले आहेत.
