
(Gondia)गोंदिया– “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत भाजपतर्फे गोंदिया जिल्ह्यात सध्या गावांमध्ये फिरून त्या ठिकाणची माती जमा करून ती दिल्ली येथे पाठवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमगाव विधानसभा क्षेत्रात माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेतील प्रत्येक गावात जाऊन माती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे आणि या माती संकल्पना बरोबरच लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील? याचा भाग म्हणून “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या मोदी सरकार च्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याच काम सध्या भाजपा द्वारा सुरू आहे. आणि या उपक्रमाला नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत असल्याचे (Sanjay Puram)संजय पुराम, माजी आमदार म्हणाले.