‘नाद लोककलेचा’ कार्यक्रम 30 सप्‍टेंबर रोजी

0

नागपूर, 27 सप्‍टेंबर

(Ministry of Culture, Government of India, New Delhi)सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली व (Jai Bhim Dr. Babasaheb Ambedkar Memorial Committee Ramtek)जय भीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक यांच्या संयुक्‍त वतीने शनिवार, ३० सप्‍टेंबर २०२३ रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 4.30 वाजेदरम्‍यान महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांवर आधारित कार्यक्रम ‘नाद लोककलेचा’ आयोज‍ित करण्‍यात आला आहे.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणा-या या कार्यक्रमाचे उद्घाटन दक्षिण मध्‍य क्षेत्र सांस्‍कृतिक केंद्राचे संचालक प्रो. सुरेश शर्मा यांच्‍या हस्‍ते होणार असून अध्‍यक्षस्‍थानी (Former Guardian Minister A. Dr. Nitin Raut)माजी पालकमंत्री आ. डॉ. नितीन राऊत राहणार आहे. (Regional Commissioner of Social Welfare Department Dr. Siddharth Gaikwad)समाज कल्‍याण विभागाचे प्रादेश‍िक आयुक्‍त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, (Sandeep Shende, Assistant Director, Directorate of Cultural Affairs)सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाचे सहायक संचालक संदीप शेंडे यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्थित राहतील.

लोक कलाकारांचा सर्वांगीण विकास व्हावा व नवीन पिढीला जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विदर्भातील लोककला पथके खडी गंमत, दंडार, भारुड, डहाका, भजन व कीर्तन इत्यादी लोककला प्रकार शाहीर, कलावंत सादर करणार आहेत.

कार्यक्रम नि:शुल्‍क असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलांचा आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष (Shaheer Alankar Tembhurne)शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी केले आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा