शिंदे गट ठाकरे गटाच्या खासदारांची कोंडी करणार

0

(Mumbai)मुंबई-शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्ष आता आणखी एका पातळीवर होणार आहे. ठाकरे गटाकडे असलेल्या चार खासदारांची कोंडी करण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून होणार आहेत. (Notice to be issued to Shiv Sena MP) विशेष अधिवेशन काळात ठाकरे गटाच्या खासदारांनी व्हीप नाकारल्याचा ठपका चार खासदारांवर ठेवण्यात येणार असून त्यांना नोटीसा पाठविल्या जाणार आहेत. शिंदे गटाच्या प्रतोद भावना गवळी यांच्याकडून खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना या नोटीसा जाणार असल्याची माहिती आहे.

अलिकडेच पार पडलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात शिंदे गटाच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी व्हीप काढण्यात आला होता. त्यात महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचा मुद्दा होता. मात्र, ठाकरे गटाचे चारही खासदार गैरहजर राहिले. (MP Vinayak Raut)खासदार विनायक राऊत, (Rajan Vichare)राजन विचारे, (Omprakash Nimbalkar)ओमप्रकाश निंबाळकर, (Sanjay Jadhav) संजय जाधव हे गैरहजर राहिल्याने त्यांनी विधेयकाच्या बाजुने मतदान केलेले नाही. त्यामुळे शिंदे गटाने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यास सुरुवात केली आहे. यातून या खासदारांची कोंडी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा