सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरी करायची आहे – विजय वडेट्टीवार

0

नागपूर NAGPUR  – मराठी माणसाच्या संदर्भात दादागिरी सुरू आहे. मुंबई मधून मराठी माणसाला हाकलण्याचा विडा उचलला आहे.मात्र, सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरी करायची आहे असा आरोप विरोधी पक्षनेते  vijay wadettiwar विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. ही दादागिरी निषेधार्ह आहे. विषाची केलेली पेरणी धोकादायक आहे. मराठी अस्मिता सरकारला असेल तर दोशीला अटक करावी अशी मागणी केली. बाप्पाने जाताना सरकारला सद्बुद्धी द्यावी ही प्रार्थना. मला सकाळी एका बुलढाण्यातील शेतकऱ्याचा कॉल आला त्याने मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. सरकार कडून मदत मिळत नाही.शासनाचे आदिवासी विद्यार्थ्यांकडे लक्ष नाही. मंत्री फक्त टेंडरकडे लक्ष देऊन आहेत. सरकारला थोडी देखील लाज नाही.

आदिवासी विद्यार्थांना विदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती अजून मिळालेली नाही. येत्या 29 तारखेला ओबीसी आरक्षणासाठी होणारी सरकार सोबतची बैठक ही फक्त भाजपसाठी होती. सरकारला ओबीसीचे प्रश्न सोडवायचे नाही, हा ढोंगीपणा आहे. त्यामुळे भाजपशिवाय इतर नेत्यांना बोलविले नव्हते. मी बैठकीत सहभागी न होण्याचं आवाहन केलं होत. त्याला सकल कुणबी कृती समितीने प्रतिसाद दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा