मंत्रालयात लाचखोरी टाळण्यासाठी हा उपाय झाला लागू

0

मुंबई MUMBAI -मंत्रालयात होणारी आंदोलने आणि लाचखोरीला आळा घालण्यासाठी सरकारने काही नियम लागू केले आहेत. मंत्रालयात प्रवेशासाठी हे नियम लागू राहणार आहेत. अभ्यागतांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन मंत्रालयात जाता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठी रक्कम असल्यास त्यांच्यासाठी ‘व्हिजिटर प्लाझा’ येथे लॉकरही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकारांना अाळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र मंत्रालयाच्या आत तीन बँकांनी एटीएमची ‘सोय’ आधीच करून ठेवलेली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना खुश करण्यासाठी येणारे ठेकेदार सोबत रोख न आणता एटीएमचाच वापर करतात. त्यामुळे नव्या नियमांमुळे खरेच लाचखोरीला पायबंद बसेल का, असा प्रश्न मंत्रालयातील कनिष्ठ कर्मचारी खासगीत बोलताना विचारतात.
दरम्यान, मंत्रालयात कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी तीन बँकांचे एटीएम लावण्यात आल्याने व त्याचा लाचखोरीसाठी वापर होत असल्याचे बोलले जात असल्याने या उपाययोजना प्रभावी ठरतील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मंत्रालयात व्यवहार होत असल्याचे सरकारने एकप्रकारे मान्य केल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा