संगीत समारोहाचा समारोप

0

 

कै. गोपाळराव वाडेगावकर स्मृती द्विदिवसीय

नागपूर, 9 ऑक्‍टोबर

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, सप्तक आणि पं. (Gopalrao Wadegaonkar) गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्विदिवसीय संगीत समारोहाचा रविवारी समारोप झाला. कै. पं. गोपाळराव वाडेगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दक्षिण अंबाझरी मार्गावरील (Platinum Jubilee Hall) प्लॅटिनम ज्युबिली हॉलमध्‍ये आयोजित या समारोहाच्‍या दुस-या दिवसाचे उद्घाटन दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशनचे अध्‍यक्ष मकरंद पांढरीपांडे यांनी केले. यावेळी सुप्रसिद्ध तबला वादक व पं. गोपाळराव वाडेगावकर यांचे शिष्य गिरीश गोगटे, सप्तकचे डॉ.श्रीराम काणे व विदर्भ साहित्‍य संघाचे कार्याध्‍यक्ष विलास मानेकर यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

सुरुवातीला (Sur Tal Sansad)”सूर ताल संसद” हा एकत्रित तबलावादनाचा कार्यक्रम झाला. सतारवर (Dr. Sriram Kane) डॉ. श्रीराम काणे,  (Dr. Uday Gupte) डॉ. उदय गुप्‍ते, व्‍हायोलिनवर (Sumant Gahankar)सुमंत गहाणकार, संवादिनीवर (Srikant Pise) श्रीकांत पिसे, तबल (Sandesh Popatkar) संदेश पोपटकर, विरथ वाडेगावकर, वेदांत मांडवणे, विश्‍वजीत चक्रवर्ती यांचा सहभाग होता. सुरुवातीला मध्‍यलयीत व नंतर द्रुत लयीत या कलाकारांनी राग पुरिया कल्‍याण सादर करीत वातावरण भारावून टाकले.

त्‍यानंतर ग्‍वालियर घराण्‍याच्‍या गायिका विदुषी मीता पंडित यांचा शास्‍त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्‍यांनी ताल विलंबित मध्‍ये निबंध राग भूप मधील ‘बैरन भरी रात’ ही बंदिश सादर केली. ‘दिल वे जांदा वे’ हा टप्‍पा, संत कविरांची एक रचना व ठुमरी सादर करून त्‍यांनी रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला दक्षिण मध्‍य क्षेत्र सांस्‍कृतिक केंद्राचे माजी संचालक डॉ. दीपक खिरवडकर, स्पिक मॅकेचे रवी सातफळे, श्‍याम देशपोडे, दीपक फडणवीस यांची उपस्‍थ‍िती होती. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी गजानन रानडे, सीमा दामले, हेमलता पोपटकर, वेदश्री मांडवगणे, चिंतामणी देशपांडे यांचे सहकार्य लाभले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा