पाच राज्यांतील निवडणुकांचा बिगुल वाजला!

0

 

(New Dillhi)मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) जाहीर केला. शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. (Assembly Election- 2023 Dates)पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला रोजी होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, पाच राज्यात एकूण १६ कोटींपेक्षा अधिक मतदार असून सुमारे ६७९ जागांवर मतदान होणार आहे. सुमारे ६० लाख युवा मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.

पाच राज्यांमध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार आहेत. 17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे. 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा