राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाहीचा अभाव होता-अजित पवार गट

0

 

(New Dellhi)नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गतात कामकाजात लोकशाहीचा अभाव आहे. पक्षावर एकच व्यक्ती अधिकार गाजवू शकत नाही. शरद पवार हे घर चालविल्याप्रमाणे पक्ष चालवित होते, असा दावा अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगापुढे सुनावणीत करण्यात आला (Sharad Pawar Vs Ajit Pawar).
आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी असल्याने पक्ष आमचाच असल्याचा दावाही अजित पवार गटाकडून करण्यात आला. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, यावर आज पुन्हा सुनावणी सुरू असून अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येत आहे. नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडत आहेत.

अजित पवार गटाकडून सांगण्यात आले की, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आमच्यासोबत असून त्यांच्या सहीनेच नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्ष आणि चिन्ह कुणाचे, याचा निर्णय कार्यकर्ते घेतील, असे अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सांगितले. यासंदर्भात अजित पवार गटाने सादिक अली केसचा दाखला दिला. सादिक अली केसमध्ये आमदारांची संख्येला महत्व देण्यात आले होते. तसेच अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या केसचाही दाखला देण्यात येत आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा