जिल्ह्यात धान कापणीला सुरुवात परतीच्या पावसाचा धोका कायम

0

 

(Gondia)गोंदिया – गेल्या सात-आठ दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील हलक्या धान पिकांच्या कापणीला सध्या सुरूवात झालेली आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये सध्या धान पीक कापणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राधेश्याम भोयर यांनी धान कापून आपल्या शेतात वाळवण्यासाठी ठेवले आहे. पण समजा यानंतर जर परतीच्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले, तर याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो असे शेतकरी राधेश्याम भोयर यांनी सांगितले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा