ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

0

(Mumbai)मुंबई-  (Shiv Sena)शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्याच्या मैदानावरुन सुरु झालेला वाद संपुष्टात आला आहे. (Shiv Sena Dussehra Melava ) शिंदे गटाने माघार घेतली आहे. शिंदे गटाचा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याचे मंत्री (Dipak Kesarkar)दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी शिवाजी मैदानाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वास्तविक शिवाजी पार्कसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट दोघेही आग्रही होते. मात्र, आता या वादावर आता पडदा पडला असल्याची चर्चा आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या या लढाईतून शिंदे गटाने माघार घेतली आहे. या दोन्ही गटांनी मुंबई महानगर पालिकेकडे अर्ज दाखल केले होते. मागील वर्षीही हा वाद झाला व ठाकरे गटाला शिवाजी पार्क उपलब्ध झाले होते.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा