“जागतिक मानसिक आरोग्य दिन”

0

 

विविध उपक्रमानी “जागतिक मानसिक आरोग्य दिन” केला साजरा

(Amravti)अमरावती – “जागतिक मानसिक आरोग्य दिन” अमरावतीमध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. अमरावती येथे मानस मन वैद्यकीय यंत्रणाद्वारे संचालित बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने आज अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये मानसिक आरोग्‍य, समज गैरसमज यावर जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादरीकरण, मानसिक आरोग्यावर आधारित चित्र रेखाटन, स्वाक्षरी अभियान, रॅली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यासारखेच महत्वाचे असून याची जाणीव सामान्य माणसाला व्हावी, यासाठी ‘नको दुरावा द्या आधार, बरे होतील मनोविकार’ यानुसार सामान्य नागरिकांना मानसिक आरोग्य बाबतीत काय वाटते? यावर डॉक्टर, प्राध्यापक, सामान्य माणूस आणि विद्यार्थी आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या मनातील भावना चित्रांच्या कलाकृती रेखाटून व्यक्त केल्या. यावेळी बाबा व्यसन मुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. (Dr. Shrikant Deshmukh) डॉ. श्रीकांत देशमुख, (Dr. Sikandar Advani)डॉ. शिकंदर अडवाणी उपस्थित होते.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा