हवामान बदलाचा कपाशीवर परिणाम

0

 

अमरावती – विदर्भातील प्रमुख पीक म्हणजे कपाशी आहे. शेतकऱ्यांच वर्षभराच गणित हे या कपाशीवर अवलंबून असते. सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना लागली आहे. अमरावती जिल्ह्यात 3 लाख हेक्टर वरती कपाशीची लागवड करण्यात आली आहे. अळीचा प्रादुर्भाव कपाशीवर दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अमरावती जिल्ह्यातील निंबोरा बोडखा येथील नामदेव वैद्य या शेतकऱ्याने 17 एकरावरती कपाशीची लागवड केली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांना कपाशीचे उत्पादन कमी होणार असल्याने चिंता सतावते आहे. दुसरीकडे सध्या स्थितीत जर बाजार भाव कपाशीचा बघितला तर 7 हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च निघणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा