मनपाच्या गेटसमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

0
सन्नी भोंगाडे 
नागपूर प्रतिनिधी

अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे त्रस्त होऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

अतिक्रमण कारवाहीत जब्त केलेला माल परत का करत नाही ?

पीडित महिलेचा मनपा अधिकाऱ्यांना सवाल

महिलेचा मेयो रुग्णालयात उपचार सुरु

नागपूर : गुरुवारी दुपारच्या सुमारास एका २८ वर्षीय महिलेने मनपाच्या गेटसमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्महदन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला , मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची परिसरात चर्चा आहे . , मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला नंदनवन परिसरात तिच्या २ मुलींसह राहते , ती केडीके कॉलेजसमोर अंडा भुर्जीच दुकान लावून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करते , तिच्या सांगण्यानुसार फुटपाथ वर दुकान लावल्यामुळे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तिच्या दुकानावर कारवाही करून सामान जब्त करतात मात्र सामान परत मागण्यासाठी गेली असता तिला पूर्ण सामान परत केलं जात नाही , वारंवार होणाऱ्या अतिक्रमण कारवाहीमुळे ती त्रस्त झाली होती ४ दिवसाआधी देखील गुरुदेव नगर येथील झोन च्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण कारवाही करून तिच्या दुकानाचा माल जब्त केला होता मात्र जब्त झालेलं सामान परत आणण्यासाठी मनपा झोन मध्ये गेली असता तिला अर्धच सामान परत करण्यात आले महिलेने सांगितले कि अधिकाऱ्यांनी तिला सामान भेटलं ते तुझ भाग्य समज काही लोकांना तर अर्ध सामान देखील परत मिळत नाही असे बोलून अपमानित करून बाहेर पाठवले त्यामुळे हि महिला इतकी टोकाला गेली कि तीने बॉटल मध्ये आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले ,घटनेच्या वेळी तिची ५ वर्षाची मुलगी देखील सोबत होती , पेट्रोल डोक्यावर टाकताच हे पेट्रोल तिच्या डोळ्यात आणि तोंडात गेल्याने ती बेभान झाली आणि तडफडत जमिनीवर कोसळली , या घटनेतील सत्यता पडताळून आपण संबंधित दोषींवर कारवाही करून अशी भूमिका मनपा आयुक्तांनी घेतली आहे .

सूत्रांच्या या महिलेवर बलात्कार झाला होता या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने तिला भर चौकात मारहाण केली होती याचे व्हिडीओ देखील प्रसार माध्यमावर प्रसरती झाले होते या प्रकरणातील आरोपी आता बेलवर बाहेर आहे आणि तो तिला केस मागे घेण्यासाठी प्रचंड त्रास देत आहे , या संदर्भात तिने नंदनवन पोलिसांकडे कित्येकदा तक्रार केली मात्र पोलीस देखील काहीच कारवाही करत नसल्याने ती भीतीच्या वातावरणात जगत आहे , पोटाच्या भाकरीसाठी म्हणून आपल्या २ लहान मुलींना सोबत ठेऊन फुटपाथवर दुकान लावून ती रात्री ११ वाजेपर्यंत दुकान चालवते मात्र वारंवार होणाऱ्या अतिक्रमण कार्वाहीमुळे ती त्रस्त झाली आहे , घरात अन्न शिजविण्यासाठी धान्य नसल्याने दुकानातील अंडाभूर्जीच ती दररोज मुलींना खाऊ घालते ,एकीकडे अतिक्रमण कारवाईचा ताण तर दुसरीकडे गुंड आरोपीच्या धमक्या या सर्व प्रकारामुळे निराश होऊन तीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे . या घटनेनन्तर तिला तात्काळ मेयो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले जिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत या पीडित महिलेला न्याय मिळणार कि नाही याकडे आता नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा