ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर

0

मुंबई : ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवर होणार असल्याचे (Dasara Melava) स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे.
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर आज महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी हा नैतिकतेचा विजय आहे व महापालिकेने यापूर्वीच विचार करुन परवानगी द्यायला हवी होती. पण उशिरा का असेना पण मनपाने शहाणपण दाखवलं, अशी प्रतिक्रिया दिली. परवानगीमध्ये जो तांत्रिक भाग होता त्यानुसार अर्जदाराचा पत्ता सेनाभवनाचा होता. सेनाभवनातूनच आपण पत्रव्यवहार करतो. तो आम्ही यापूर्वीच केला होता. गेल्या वर्षीही कोर्टाने आम्हाला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शिस्तप्रिय शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा होईल, असे अहिर म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा