NAGPUR नागपुरात काँग्रेस बैठकीत पदाधिकाऱ्यांचा राडा!

0

 

पटोले -वडेट्टीवरांसमोरच तमाशा

NAGPUR नागपुरात बुधवारी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी आपापासतच भिडले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच ही बाचाबाची झाली आहे. नाना पटोले यांच्यासोबत काँग्रेसचे महत्त्वाचे नेते देखील बैठकीत उपस्थित होते. A spectacle in front of Patole – Vadettivara 

काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार  City President of Congress Vikas Thackeray and Narendra Jichkar यांच्यातील वादाने या भांडणाला सुरुवात झाली.
यामुळे प्रदेशाध्यक्षांसमोरच झालेल्या या प्रकराने सभागृहात एकच गोंधळ उडाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसे प्रमुख नेत्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु दोन्ही बाजूंपैकी कोणीही ऐकून घ्यायला तयार नव्हते . उलट नेत्यांचे समर्थक आपापसातच भिडले. त्यानंतर महाकाळकर सभागृहाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एकच गर्दी झाली. आधीच कमकुवत होत चाललेल्या काॅंग्रेस पक्षात ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्भवलेला हा वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.

 नेमके काय घडले? 

काँग्रेसच्या पूर्व विदर्भाच्या आढावा बैठकीत जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला असून यानिमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बैठकीतील वाद वाढून माजी मंत्री सुनील केदार व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे बैठकीतून निघून गेल्याची माहिती आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी शांततेचे आवाहन करुनही बैठकीतील काँग्रेसचे कार्यकर्ते मंचावर चढून जोरदार घोषणाबाजी करीत असल्याचे चित्र बघायला मिळाले. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अलिकडे राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसने राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा सुरु केला आहे. त्यातील नागपूर विभागाची म्हणजे पूर्व विदर्भाची बैठक गुरुवारी सकाळी पूर्व नागपुरातील महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी आमदार अभिजित वंजारी यांच्याकडे होते. बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. सुरुवातीला नागपूर शहराचा आढावा सुरु असतानाच हा प्रकार घडला.

काही जणांच्या मते बैठकीत माईकवर बोलण्यावरून वाद झाला. यावेळी वादाचे रूपांतर जोरदार गोंधळात झाले. त्यामुळे सुनील केदार, विजय वडेट्टीवार निघून गेल्याची माहिती आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी सभागृहात गोंधळ घातला. काही कार्यकर्त्यांनी सांगितले की, अलिकडेच विरोधी क्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी राहुल गांधी यांच्या विषयी केलेल्या एका वक्तव्यावरुन वादाची ठिणगी उडाली. या वक्तव्याचा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी बैठकीच्या वेळी निषेध केला. तुम्ही इथे आलात कसे? असा जाब विचारला. तर दुसरीकडे प्रदेशातील एका नेत्याने यावेळी सावरासराव करायचा प्रयत्न केला. यानंतर या वादाचे रूपांतर जोरदार गोंधळात झाले. यावेळी धक्काबुक्कीचा प्रकारही घडल्याचे सांगण्यात येत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा