
– आज भाजप ओबीसी जागर यात्रेचा पोहरादेवीत समारोप
नागपूर -ओबीसी समाजाला मिळालेल्या 27 टक्के योगदानात काँग्रेसचे शून्य टक्के योगदान असल्याचा आरोप भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केला. भाजप ओबीसी जागर यात्रेच्या माध्यमातून ते आज देऊळगाव राजा, सिंदखेडराजा येथे मार्गदर्शन करीत होते. 1950 ते 1992 चा काँग्रेसचा ओबीसी संदर्भातील इतिहास ओबीसी जनतेपुढे मांडण्याचे काम त्यांनी यावेळी आकडेवारीसह केले. सारथी, बार्टी प्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना महाज्योतिचा लाभ भाजपने दिल्याचे सांगितले. आजवर काँग्रेसने ओबीसी समाजाची केवळ दिशाभूल केली,उलट भाजपने पंतप्रधान नर्रेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीला खऱ्या अर्थाने न्याय दिला. केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना ओबीसी,बारा बलुतेदारांसाठी फायदेशीर ठरणार असून भाजप ओबीसींचा ओबीसी भाजपचा हेच या यात्रेचे सूत्र आहे असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले. ओबीसींना न्याय देण्याची इच्छाशक्ती केवळ भाजपात असल्यावर भर दिला.
भाजप ओबीसी जागर यात्रा वर्धा, नागपूर,अमरावती, अकोला, शेगाव,जळगाव जामोद बुलढाणामार्गे आज अखेरच्या टप्प्यात आहे. संजय गाते म्हणाले, खऱ्या अर्थाने 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांनी ओबीसी उत्कर्षाची सुरुवात केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून ओबीसी मंत्रालय सुरू केले. सातत्याने ओबीसी समाजाला न्याय दिला.या विभागाचे पहिले मंत्री म्हणून संजय कुंटे यांना काम करण्याची संधी मिळाली. काँग्रेसवाले केवळ ओबीसी समाजाच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत असा आरोप केला. उद्या शुक्रवारी 13 ऑक्टोबरला बंजारा समाजाचे आराध्य दैवत पोहरादेवी येथे ओबीसी जागर यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड ,केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आमदार डॉ आशिष देशमुख, अर्चना डेहनकर, ओबोसी मोर्चा प्रदेश सहसंपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
