
प्रा सुरेश चोपणे
चंद्रपूर

महाराष्ट्राच्या भूगर्भात काय काय दडले आहे हे नव–नव्या संशोधना नंतर पुढे येत आहे.कोट्यावधी वर्षापूर्वी तयार झालेले मौलिक खनिजे,धातू पुविदार्भात मिळाले होतेच परंतु आता महाराष्ट्रातील बहुतेक भागात सुद्धा मिथेन वायूचे साठे सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .आजपर्यंत नैसर्गिक वायूंचे साठे समुद्रातच आढळत होते परंतु पेट्रोलियम आणि प्राकृतिक गेस मंत्रालयाच्या हायड्रोकार्बन महानिर्देशनालयाने येथे २०१६–२०१७ मध्ये सर्वेक्षण केले आणि चक्क चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यात ८४ बिलीयन क्युबिक मीटर एवढे तर एकून महाराष्ट्रात चक्क २,३७,५०० वर्ग/किमी परिसरात १.२ ट्रीलीयन क्युबिक फिट मोठे कोल बेडेड मिथेन चे साठे सापडले. असेच साठे महाराष्ट्राच्या ७० % भागात असल्याची ही महत्वाची माहिती शासकीय अहवालात आढळली आहे.मिथेन वायू हा वाहनात इंधन म्हणून,विद्युत निर्मितीत,उद्योगात,घरी इंधन म्हणून आणि अवकाश मोहिमेत इंधन म्हणून वापर होतो.
शासनातर्फे ह्यापुर्वि सुद्धा विदर्भात आणि महाराष्ट्रात सर्वेक्षण केले गेले होते परंतु आधुनिक तंत्रज्ञाना अभावी ह्या साठ्यांचे आकलन करता आले नव्हते.परंतु खऱ्या अर्थाने जमिनीवरील कोल बेड मिथेन (CBM) च्या साठ्यांकडे शासनाचे लक्ष २०१६–२०१७ नंतर गेले आणि संपूर्ण देशात विविध वैद्न्यानि पद्धतीने ( ड्रील करून,२/३ D सिस्मिक सर्वे,जिओ सायन्टीफिक सर्वे,ग्राव्हिटी आणि मेग्नेटीक सर्वे ) सेडीमेंटरी बेसिन मध्ये ३.४ मिलीयन वर्ग/किमी भूभागावर हे साठे शोधून काढले आहेत. हा अहवाल महानिदेशानाल्याने मे २०२३ मध्ये प्रकाशित केला आहे.देशात एकूण २६ स्तरित वालुंच्या खडकांचे बेसिन आहेत ,त्यात वर्गवारी १ चे ७ बेसिनमध्ये उत्पादन सुरु आहे.५ बेसिन हे वर्ग २ मध्ये येत असून ते उत्पादनक्षम आहेत.वर्ग ३ च्या १४ बेसिन्स आहेत ज्यातून भविष्यात गेस चे उत्पादन होऊ शकते. ह्या वर्ग ३ श्रेणीत महाराष्ट्रातील डेक्कन बेसिन आणि पूर्व विदर्भातील प्राणहिता–गोदावरी बेसिन चा समावेश आहे.श्रेणी ३ मध्ये येणाऱ्या बेसिनचे सविस्तर संशोधन केल्यानंतर इथे व्यावसाईक साठे आढळले तर उत्पादन करता येईल असे मंत्रालयाने म्हटले आहे.असे साठे पूर्ण महाराष्ट्राच्या ७०% भूभागात कमी अधिक प्रमाणात सापडले आहेत .ह्यात सर्वाधिक व्यावसाईक मिथेन चे साठे चंद्रपूर आणि सिरोचा परिसरात आढळले आहेत.
देशात मिथेनचे साठे कुठे आढळले– नँशनल सिस्मिक प्रोग्राम अंतर्गत भारतात शासनाने २०१६–२०२२ काळात देशभर सेडीमेंटरी बेसिन चा २/३ डी सिस्मिक सर्वे, जिओ सायंटीफिक सर्वे, ग्रावीटी आणि माग्नेटीक सर्व्हे केला आणि ड्रिल च्या माध्यमातून कोल बेडेड मिथेन चा तपास केला ह्यातून समुद्रा ऐवजी जमिनीवर विविध सेडीमेंटरी बेसिन मध्ये मिथेनचे साठे आढळले .(सोबतच्या नकाशात दर्शविल्या प्रमाणे ) हे साठे ३.४ मिलियन वर्ग/किमी भूभागाच्या आत आहेत.
महाराष्ट्रात मिथेन साठे कुठे आढळले– महाराष्ट्रातील डेक्कन सिनेक्लाइस बेसिन मध्ये केंद्र शासनाने २०१७ ते २०२२ वर्षा दरम्यान सर्वेक्षण केल्यानंतर इथे मिथेनचे साठे असल्याचे कळले. हे बेसिन सभोवतालच्या ३ राज्यापर्यंत असून त्यात महाराष्ट्रातील ७० % आणि परिसरातील राज्यात २०% भूभागात म्हणजे २,३७,५०० वर्ग/किमी परिसरात आहेत.जमिनीवरील डेक्कन ट्रापच्या आंत १.५–ते २.०० किमी जाडीच्या गोंडवाना समूहाच्या वाळूच्या थरात हे साठे आहेत. डेक्कन सिनेक्लाईन बेसिन नावाने हे साठे ओळखले जाते आणि ह्यात १२ मिलियन मेट्रिक टन कोल बेडेड मिथेन चे कमी अधिक प्रमाणात साठे आढळले आहेत. साठे नसलेल्या जिल्ह्यात नंदुरबार,जळगाव,बुलढाणा,अमरावती,गोंदिया,भंडारा,वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. हे सर्व साठे ३ मध्ये येत असून ह्यातील काही साठे पूर्णता व्यावसाईक पात्रतेचे नाहीत,भविष्यातील सविस्तर संशोधनातून त्यांची उपयोगिता कळेल.( नकाशात करड्या रंगात दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्रातील भूभाग)
विदर्भ–तेलंगानात प्राणहिता गोदावरी बेसिन – नँशनल सिस्मिक प्रोग्राम अंतर्गत भारतात शासनाने २०१६-२०२२ काळात देशभर सेडीमेंटरी बेसिन चा २/३ डी सिस्मिक सर्वे, जिओ सायंटीफिक सर्वे, ग्रावीटी आणि माग्नेटीक सर्व्हे केला आणि ड्रिल च्या माध्यमातून कोल बेडेड मिथेन चा तपास केला. ह्यात महत्वाची आकडेवारी गोळा केली गेली. विदर्भ आणि तेलंगाना राज्यात प्राणहिता–गोदावरी हे स्तरित खडकाचे बेसिन ३०,००० वर्ग/किमी परिसरात व्यापले आहे. हे बेसिन नागपूर – चंद्रपूर– सिरोंचा ते तेलंगाना मधील अस्वरापेटा पर्यंत व्यापले आहे .ह्याची रुंदी १०० तर लांबी ४०० किमी इतकी आहे. ह्या बेसिन मधील काही साठे जमिनी पासून ६००० मीटर इतक्या खोलवर आहेत. ह्यात भुपट्टीय दृष्ट्या ४ विभाग पाडण्यात आलेले आहेत त्यात अस्वरापेठा ,चंद्रपूर, सिरोंचा आणि नागपूर असे हे भाग आहेत आणि त्यात कोल बेडेड मिथेनचे ८४ बिलियन कुबिक मीटर इतके साठे आढळले आहेत .ह्यातील अस्वरापेठ हा ३८० वर्ग/किमी चा ब्लॉक ( GV(N)-CBM-2005/111) मिथेन च्या साठ्याने भरलेला असल्याने त्याची बोली लागली असून तो ब्लॉक कोल्गेस मार्टलिमिटेड ला दिला आहे.
विदर्भात चंद्रपूर,सिरोंचा ब्लॉक मध्ये मिथेन साठे – पूर्व विदर्भातील ३ ब्लॉक मध्ये नागपूर ब्लॉक मध्ये कमी साठे आहेत.मात्र ह्यातील चंद्रपूर आणि सिरोंचा हे दोन ब्लॉक वर्ग ३ मध्ये गणले जात असून सुद्धा इथे असलेल्या साठ्यांच्या शक्यतेनुसार त्यांचा वर्ग २ ह्या व्यावसाईक दृष्ट्या महत्वाचे गटात समाविष्ट होण्याची शक्यता आहे .विशेष म्हणजे हे दोन मिथेन ब्लॉक हर्हास करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ONGC ह्या कंपनीने ह्यात काम करण्याची आणि .
चंद्रपूर ब्लॉक – चंद्रपूर मिथेन ब्लॉक हा ५०३ वर्ग/किमी परिसरात पसरलेला आहे. ह्यात ब्लॉकमध्ये चंद्रपूर,बल्लारशा ,गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्याचा आणि तेलंगणाच्या आदिलाबाद तालुक्याचा समावेश होतो. चा चंद्रपूर ब्लॉक ( WD-CBM-2003/2) घेण्याची तयारी ONGC तेल कंपनीने इच्छा व्यक्त केली आहे, परंतु २०२३ पर्यंत अजून ह्या ब्लॉकसाठी कुन्याही तेल कंपनीने बोली लावली नाही.
सविस्तर संशोधनानंतर इथे मोठे साठे मिळण्याची शक्यता असल्याचे शासनाने म्हटले आहे.
इथे १९९६–९८ साली सर्वे झाला होता परंतु मिथेनच्या साठ्यासाठी २०१६–१७ साली पुन्हा सर्वे केला गेला ह्यात २/३ D सिस्मिक सर्वे,जिओ सायनटीफिक सर्व्हे ,ग्रावीटी अंड माग्नेटीक सर्वे आणि ड्रील ह्या पद्धतीने हा सर्वे केला गेला.
सिरोंचा ब्लॉक– सिरोंचा ब्लॉक– सिरोंचा ब्लॉक हा गोंडपिंपरी तालुक्यापासून सिरोंचा आणि तेलंगाना क्षेत्रात येत असून त्याची व्याप्ती ७०९ वर्ग/किमी परिसरात असून त्यात ४७ बिलियन क्युबिक मीटर एवढे साठे आहेत. .ह्या ब्लॉकचा क्रमांक PG-ONHP(CBM)2022/2 असून हा ब्लॉक सुद्धा हर्हास करण्याची प्रक्रिया मागील वर्षी पार पडली होती.मात्र अजून हा ब्लॉक कुणीही घेतला नाही.
नागपूर ब्लॉक हा मजबूत बेसाल्ट खडकाच्या खूप आंत असून तो अजून व्यावसाईक दृष्ट्या सक्षम मानल्या गेला नाही. पुन्हा इथे सर्वेक्षण केल्या नंतर इथे किती साठे आढळतील ह्याचा अंदाज घेतल्या जाणार आहे. टेक्टाँनिक दृष्ट्या हा ब्लॉक चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पासून नागपूर च्या उत्तर सिमेपर्यंत व्यापला आहे.
प्राणहिता–गोदावरी बेसिनचे भौगोलिक वैशिष्ट्य – कोट्यावधी वर्षापूर्वी नद्यांनी वाहून आणलेल्या वनस्पती ह्या खोल दऱ्यात साठून कोळसा तयार झाला होता. हे थर विशेषता वाळूच्या थरात आढळतात .ह्याच कोळसा तयार होण्याच्या प्रक्रियेतून मिथेन वायू सुद्धा तयार झाला. सर्वात खोल साठे प्रोटेरोझोईक ह्या २०० कोटी वर्षापूर्वीच्या काळातील असून इथे फारसे मिथेन साठे नाही.सध्या सर्व्हे केलेला हा मिथेन वायू तयार होण्याचा काळ लोअर पर्मियन ते लोअर ट्रीयास्सिक ह्या ३० कोटी वर्षाचा आहे. सर्वात खोलवर लोअर प्रोटेरोझोईक काळ तर सर्वात वर गोंडवाना थर आहेत.त्यानंतर त्या साठ्यावर टणक रुपांतरीत दगडांचे थर साठत गेले आणि हे साठे भूगर्भात सुरक्षित राहिले.हे साठे इंट्रा टेक्क्टानिक रिफ्ट मुळे साठवले गेले आहेत.जिथे जास्त साठे आढळले ते तालचीर,बाराकार,लोअर–अप्पर–मिडल कामठी फोर्मेशन मध्ये आढळतात. हे वाळूचे थर ३ ते ४ किमी जाडीचे आहेत.२०१७ नंतरच येथील साठ्यांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून येथे नव्याने सर्वेक्षण केले जाईल.ही सविस्तर माहिती हायड्रोकार्बन रेसोर्स असासमेंट रिपोर्ट २०२३ मध्ये दिली गेली आहे .
अ.क्र | भौगोलिक काळ —- ३० कोटी ते २० कोटी वर्षे | मिथेनचे साठे |
१ | पँलेओझोइक पर्मो– ट्रीअस्सिक ( अप्पर कामठी) | ४ मीलीयन.मेट्रीक.टन |
२ | पँलेओझोइक पर्मो– ट्रीअस्सिक ( मिडल कामठी)
|
४३ मीलीयन.मेट्रीक.टन |
३ | पेलेओ पर्मियन | ४४ मीलीयन.मेट्रीक.टन |
४ | पेलेओ कॅर्बोनिफेरस ( अप्पर पर्मीयन ) | ३ मीलीयन.मेट्रीक.टन |
प्रा सुरेश चोपणे
पर्यावरण आणि भूशास्त्र अभ्यासक
अध्यक्ष– ग्रीन प्लानेट सोसायटी
आजीव सदस्य– १) इंडियन सायन्स कोन्ग्रेंस–कोलकाता २) मराठी विज्ञान परिषद– मुंबई ३) संस्थापक–सुरेश चोपणे अश्म संग्रहालय,चंद्रपूर
(टिप-प्रसूत माहिती हायड्रोकार्बन महानिदेशालय , पेट्रोलियम आणि प्राकृतिक गेस मंत्रालय,भारत सरकार ह्याच्या सर्व्हे वरून घेतलेली आहे )