भारत-पाकिस्तान लढतीवर पावसाचे सावट?

0

अहमदाबाद- एकदिवसीय विश्वचषकात कट्टरप्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत उद्या शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. (ICC Cricket World Cup) या लढतीबाबत दोन्ही देशांमधील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सूकता असताना या सामन्याला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने रसिकांची धाकधूक वाढली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अहमदाबाद शहर आणि उत्तर गुजरातमध्ये शनिवार आणि रविवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळू शकतो. सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. त्यामुळे पावसाचा व्यत्यय येऊन नये, अशी प्रार्थना या लढतीचे चाहते करीत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकावेळी एक लाखांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. प्रत्येकाला हा रोमांचक सामना पाहायचा आहे. परंतु, या सामन्यात पाऊस गोंधळ घालण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने अहमदाबाद शहर आणि उत्तर गुजरातमध्ये शनिवारी (१४ ऑक्टोबर) आणि रविवारी (१५ ऑक्टोबर) पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा