थोड्याच वेळात रंगणार भारत-पाक सामन्याचा थरार!

0

अहमदाबाद-एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ झुंजणार असून वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहिलेल्या भारतापुढे हा रेकॉर्ड कायम ठेवण्याचं तर पाकिस्तानपुढे नवा रेकॉर्ड लिहिण्याचे आव्हान आहे. (ICC World Cup-2023) फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या स्टेडिअमवर क्रिकेट रसिकांचे लक्ष शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा या तडाखेबंद फलंदाजांच्या कामगिरीवर राहणार आहे. तर पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान कामगिरीवर पाकिस्तानच्या रसिकांचे लक्ष असेल. शुभमन गिल खेळू शकते, असे संकेत मिळत असल्याने भारताच्या चिंता कमी झाल्या आहेत.

या स्पर्धेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील हा आठवा सामना असेल. टीम इंडियाचा रेकॉर्ड ७-० असा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा ५०वा आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. त्यामुळे ही क्रिकेट रसिकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे.
काही दहशतवादी संघटनांकडून आलेल्या धमक्या पाहता सामन्यापूर्वीच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ११ हजारांवर सुरक्षा रक्षक सज्ज आहेत. स्टेडियमवर आज एक लाखाहून अधिक प्रेक्षक सामना पाहणार आहेत. स्टेडियमबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसत आहे. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते टीम इंडियाचा जयघोष करीत असल्याचे चित्र आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा