बुकी सोंटू जैन याची अखेर न्यायालयात शरणागती

0

 

नागपूर : ऑनलाईन गेमिंगद्वारे कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेला बुकी अनंत उर्फ सोंटू जैन हा सोमवारी प्रथम श्रेणी न्यायालयापुढे शरण आला. सोनू हा काही महिन्यांपासून फरार होता. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर नाईलाज होऊन
सोंटूने सोमवारी प्रथम श्रेणी न्यायालयापुढे शरणागती स्वीकारली.
सोंटूने व्यावसायिक विक्रांत अग्रवाल यांची ऑनलाइन गेमिंगद्वारे कोट्यावधी रुपयांनी फसवणूक केली होती. या संदर्भात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. नागपुरात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी सोंटूचा
गोंदिया येथील निवासस्थानावर छापा घातला. त्यावेळी पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले होते. त्याच्या निवासस्थानावरून सुमारे 17 कोटी रुपयांची रोख रक्कम, साडेबारा किलो सोने, सुमारे 300 किलो चांदी असा एकूण सुमारे 27 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा